खारघर दुर्घटनेतील लोकांचा मृत्यू कशामुळे? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खारघर उष्माघात प्रकरणात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याने राजकीय वातावरण आधीच तापलं आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाला असून सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याच दरम्यान आता सर्व श्रीसेवकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर आलं आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार, मृत्यूमुखी पडलेल्या 14 पैकी 12 जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. मृत्यू होण्यापूर्वी 6 ते 7 तास त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक ऊन आणि गर्मी असलयामुळे मृतांच्या शरीरात पाण्याचा थेंबही नव्हता असं स्पष्ट झालं आहे. या मृतांपैकी काही जण आधीच आजाराने त्रस्त होते, त्यातच डोक्यावर कडक ऊन आणि पोटात काही नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये समोर आली आहे.

दरम्यान, खारघर दुर्घटनेतील मृतांचा आकडा सरकारकडून लपवण्यात येतोय असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आत्तापर्यंत या घटनेत 50 श्रीसेवकांचा मृत्यू झाला असा दावा त्यानी केला आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही गप्प का आहेत असा सवालही त्यांनी केला. ज्या लोकांनी साधूंच्या हत्येनंतर छाती पिटली, ते लोक आज खारघरमधील 50 जणांच्या मृत्यूनंतर गप्प बसले आहेत. देवेंद्र फडणवीसांची माणुसकी आता मेली आहे का? अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलं