आंबेघरमधील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील मुलांची शिक्षणाची जबाबदारी “खिदमत ए खल्क” ने स्वीकारली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला असून तुम्ही एकटे नाही. आम्ही सर्व तुमच्या कुटुंबातील सदस्य आहोत. निःसंकोचपणे काहीही जबाबदारी असल्यास पार पाडू. तसेच आंबेघर गावातील आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबियांना गरजेच्या वस्तू दिल्यानंतर ज्या 9 कुटुंबियातील व्यक्तीचा मृत्यू भुस्खलनामुळे झाला आहे. त्या कुटुंबातील सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च खिदमत ए खल्क कमिटी पै नजीर अब्बास खान स्कॉलरशिपच्या माध्यमातून करणार असल्याचे सादिकभाई शेख यांनी जाहीर केले.

सातारा शहर मुस्लिम जमातच्या वतीने अमीर सहाब, अनिसभाई तांबोळी यांच्या सूचनेनुसार खिदमत ए खल्क च्या मोहसीन बागवान, मुबिन महाडवाले, सलीम यांच्या मार्गदर्शनानुसार आरिफ खान असिफ फरास ,इम्रान सुमो ,पिंटूशेठ सुतार ,सलीम पाळणेवाले ,अज्जूभाई घड्याळवाले ,तौसिफ बागवान ,हाफिज मुराद ,मोहसीन ,जावेद बागवान समीर मोबाईल ,सलमान भाईजि असिफ खान व इतर बांधवानी परिश्रम घेतले.

माणुसकीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या साताऱ्यातील मुस्लिम शहर समाजावतीने कार्यरत असणाऱ्या खिदमत ए खल्क कमिटीने मोरणा भागातील अपत्तीग्रस्त व दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या गरजा जाणून ज्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. त्यांच्या दुःखात सामील होत तात्पुरत्या पुनर्वसनाचे किट भेट दिले. आंबेघर येथील 9 कुटुंबांच्या सर्व सदस्यांना कपडे, अन्नधान्य देण्यात आले.

सातारा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने खिदमत ए खल्क माध्यमातून दोन दिवस केलेले उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खिदमत ए खल्क च्या सर्व सदस्यांचे आभार माजी जि. प. सदस्य बशीर खोंदू यांनी मानले.

You might also like