किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा; अनुपम खेर यांनी केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वायरल होताना दिसत आहे. मात्र हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचा खुलासा स्वतः अनुपम खेर यांनी केला आहे. किरण खेर या अनुपम खेर यांच्या पत्नी असून त्यांच्या निधनाबाबतचे वृत्त अफवा असल्याचे अनुपान खेर यांनी ट्विट करीत सांगितले आहे. याउलट किरण खेर यांची तब्येत आता आधीपेक्षा व्यवस्थित असून हे सर्व खोटे आहे. त्या पूर्णपणे बऱ्या होत आहेत. तर त्यांनी दुपारी कोरोनाच्या लशीचा दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या सोशल मीडियावर काही लोक किरण खेर यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या बातमीमुळे अनेकजण किरण यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. अखेर या बातमीस रोख लावणे आवश्यक असल्याचे भासले असता, खुद्द अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, हि केवळ अफवा आहे जी किरणच्या तब्येतीबाबत पसरवली जात आहे. हे चुकीचे आहे. ती अगदीच बरी आहे. इतकेच नव्हे तर तिने नुकताच दुपारी कोविद व्हॅक्सिनचा दुसरा डोसही घेतला आहे. मी लोकांना विनंती करतो की अशा निगेटिव्ह बातम्या पसरवू नका. आभारी. सुरक्षित रहा.

किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनुपम खेर यांनी एप्रिल महिन्यात सांगितले की, किरण मल्टीपल मायलोमा या एक प्रकारच्या ब्लड कॅन्सरने पीडित आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ती आधीपेक्षा अधिक खंबीर बनून या आजारातून बाहेर येईल. आम्ही नशीबवान आहोत की, उत्तम डॉक्टरांची टीम किरणवर उपचार करतेय. ती फायटर आहे आणि या संकटालाही ती परतवून लावेल. किरण खेर जे काही करते ते मनापासून करते. तिचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. म्हणूनच लोक तिच्यावर इतके प्रेम करतात. ती ठीक आहे आणि बरी होतेय. तुमच्या प्रेम आणि पाठींब्यासाठी आभार.

Leave a Comment