लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड.
खेड बुद्रुक ता.खंडाळा येथील किरण रासकर यांची पोलीस निरीक्षक पदी बढती झालेली असून खेड बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलेला आहे.यावेळी जेष्ठ नेते बबनराव धायगुडे- पाटील,सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे-पाटील, सागर धायगुडे-पाटील, जेष्ठ मार्गदर्शक आप्पासो धायगुडे-पाटील, युवा नेते किरण धायगुडे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती खेड बुद्रुकचे अध्यक्ष सुनील रासकर, नवरत्न गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक हरिभाऊ रासकर, रामदास हाके, विजय धायगुडे, अमोल धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रासकर, अमोल राऊत, भानुदास रासकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे-पाटील यांनी सत्कारावेळी किरण रासकर यांनी सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.अशीच शिखरे पादाक्रांत करत जाऊन खेड बुद्रुकचे नांव झळकत राहो.ही सदिच्छा सरपंच गणेश नामदेवराव धायगुडे- पाटील यांनी अभिनंदनपर सत्कारावेळी व्यक्त केली.तसेच गावातील युवकांना आपले मार्गदर्शन मिळत राहो.अशी आशा व्यक्त करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
सत्काराला उत्तर देताना किरण रासकर यांनी म्हटलेले आहे की,आपल्या या घरच्यांच्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाने मी भारावून गेलो.अशाच शुभेच्छा रुपी आशिर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशी आशा करतो. देशाची तसेच गावातील ज्येष्ठ माता-भगिनी व युवकांची माझ्या हातून सेवा घडो.अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’