Wednesday, October 5, 2022

Buy now

“उद्धव ठाकरेंची माफिया सेना महाराष्ट्राला लुटतेय”; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यासाठी मी आज सुजीत पाटणकर विरोधात न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंनी केवळ पैसे कमावयाचे म्हणून कंत्राट दिले. या ठाकरेंचा माफिया सेनेने महाराष्ट्रातला लुटले आहे. संजय राऊत आणि सुजीत पाटणकर पार्टनर आहेत. दोन्ही फॉरेनला मिळून जातात, अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी नुकताच मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोरोना होता म्हणून आम्ही शांत होतो, यावर आता कारवाई व्हायला हवी. संजय राऊत यांनी ही नौटंकी आधीही केली. संजय राऊत यांची तक्रार खोटी होती. हे कोर्टात सांगावं लागलं. सरकारचे एकापाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत आहे. त्यामुळे केंद्रीय तापस यंत्रणावर दबाव आणत आहेत. डझनभर नेते जेलमद्ये जाणार उद्धव ठाकरेंनी कितीही नौटंकी करु द्या. उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याचा घोटाळा बाहेर आला ना सामान्य लोकांच्या जावीशी पैसे खाण्यासाठी खेळत आहेत

याच्या आधीचे पाटणकरचे अनेक किस्से आहेत. आदित्य ठाकरेंनी अनेक कंपन्यातून पैसा दिला. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. उद्धव ठाकरेंनी माफीय सेना उभा केली. ईडी आपला तपास करत आहेत. मी तुम्हीला पुरावे देतो. कारवाई फक्त पाटणकरवर नाही बाकीचेही आत जाणार आहेत हे नक्की आहे. याचे उत्तर उद्धव ठाकरे का देत नाहीत? माफीयासेनेच्या लोकांना कमवून देत आहेत. आदित्य ठाकरेंनी तीन कंपन्या एका व्यवसायिकाला दिल्या, अशी माहितीही यावेळी सोमय्या यांनी दिली.