“मी जेलमध्ये जायला तयार, पण… “; किरीट सोमय्यांचे राऊतांना थेट चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना खासदार राऊत यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी आज आझाद नगर पोलिस स्थानकात 89 पानांची तक्रार आझाद नगर पोलिस स्थानकात दिली. यावेळी त्यांनी सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट दिले असून पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. तसेच “संजय राऊतांना मी मूर्ख वाटलो काय? आता मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण त्याआधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या,”असे थेट चॅलेंज सोमय्यांनी राऊतांना दिले.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज आझाद नगर पोलीस ठाण्यात संजय राऊतांसह इतर सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे याची चौकशी करून पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा.वी, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत एफआयआर दाखल केला नाहीतर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये केस फाईल करणार आहोत.

यावेळी सोमय्या यांनी प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले की, आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 89 पानी पोलिस तक्रार केली आहे. राऊतांच्या जवळच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला तरी मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई का केली नाही? सुजीत पाटकरला अटक का केली नाही? संजय राऊतांनी नौटकी बंद करावी. चहावाल्याची नीट चौकशी करा सुजीत पाठकरला अटक करा, अशी मागणी या निमित्ताने मी करत असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले.