अब तेरा क्या होगा कालिया?; सचिन वाझे प्रकरणी सोमय्यांचा अनिल परबांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. यावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “अब तेरा क्या होगा कालिया असे म्हणत सोमय्या यांनी अनिल परब यांना झोप येत नसेल आणि उद्धव ठाकरेंचीही झोप उडाली असेल, अशी टीका केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसेच ट्विट करतही उद्धव ठाकरे व अनिल परब यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार करण्याचा प्रस्ताव कोर्टाने मंजूर केलाय आहे. यावरून मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो अब तेरा क्या होगा कालिया…उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे सचिन वाझेची नियुक्ती केली होती. सचिन वाझेकडून आलेला 100 कोटीच्या वसुलीचा पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतवण्यात आला होता. अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

यावेळी सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याच्या प्रकारावर हि प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इतकी भीती का आणि कशाची वाटते? स्वतःच्या पक्षाचे आणि मित्रपक्षाचे आमदार विकले जाऊ शकतात, असा आरोप संजय राऊत करत आहेत, देवेंद्र फडणवीस नाही. बेईमान कोण आहे…शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते?” असा सवाल यावेळी सोमय्या यांनी विचारला.

Leave a Comment