सोमय्या पिता- पुत्रांना अटक करा; संजय राऊतांनी बाहेर काढला ‘हा’ घोटाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या याना अटक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच राकेश . पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि किरीट सोमय्या यांचे आर्थिक संबंध असून राकेश बावधन याने भाजपाला २० कोटी रुपये दिले असा आरोपहि त्यांनी केला आहे.

निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली असा आरोप संजय राऊत यांनी केला

किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल..या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा असून महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना त्यांच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचे कार्पेट वापरण्यात आले असेही त्यांनी सांगितले ईडी ला ते दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केला

Leave a Comment