Saturday, January 28, 2023

ही तर ठाकरे सरकारची दडपशाही, अशा धमक्यांना भीक घालत नाही; सोमय्यांचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकार वर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्यच नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणाले, ही ठाकरे सरकारची ठोकशाही असून गणेश विसर्जनापासून मला रोखलं लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं.

- Advertisement -

ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं. राष्ट्रवादीच्या भाई लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे असं सोमय्या यांनी म्हंटल. ,उद्धव ठाकरेंची इच्छा आहे किरीट सोमय्ायंवर हल्ला व्हावा, याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्वावं लागेल.