किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त महिला अधिकाऱ्यांनी आँख मारे गाण्यावर धरला ठेका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्या दिलखुलास अंदाजाने ज्यांनी अवघ्या भारताला मोहून टाकलं असे प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांची आज जयंती आहे. संपूर्ण देशभरात त्यांची जयंती साजरी केली जाते. सध्या त्यांच्या जयंतीनिमित्त्त एक कार्यक्रम आयोजिय करण्यात आला होता. त्यांच्या जन्मस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने मोठी खळबळ उडाली आहे.अभिनेते किशोर कुमार (kishore kumar) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजे मध्य प्रदेशातील खंडवा इथे गौरव दिवस साजरा केला जातो. तीन दिवसीय गौरव दिवसांतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात आयोजित केलेला झुंबा डान्स कार्यक्रमाने सध्या खळबळ माजवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
किशोर कुमार (kishore kumar) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रोग्रॅममध्ये दिल धडकाए, सिटी बाजाए, आँख मारे या गाण्यावर जिल्हा पंचायत CEO आणि नगर निगम कमिश्नर सविता प्रधान यांनी तुफान डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे या महिला अधिकारी सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोल होत आहेत. या व्हिडिओवर काही लोकांनी थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट करून कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये अनेक तरुण आणि शालेय मुलांसह अधिकारी सुद्धा डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र त्यांनी यावेळी लावलेल्या गाण्यावरून सध्या त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
संपवू वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा; सामनातून नड्डांवर टीकेचा बाण

शिंदे- फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ???

शिंदे-फडणवीस सरकारला मुहूर्त मिळाला; ‘या’ दिवशी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

शिंदे गटातील आमदारांना मिळणार ‘या’ दर्जाची सुरक्षा; सामंतांवरील हल्ल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय