Kitchen Hacks : केवळ एक रुपयाच्या शाम्पूत काळपट बर्नर होईल चकाचक ; वापरा ही सोपी ट्रीक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kitchen Hacks : हल्ली कुणाच्या घरात गॅस शेगडी नाही असे होत नाही. शहरी भागात तर प्रत्येकाच्या घरात गॅस शेगडी असतेच . आपण किचनचा ओटा गॅस शेगडी हे सर्व सहज साफ करत असतो. मात्र गॅस चे बर्नर हे नियमित साफ केले जात नाही. हे बर्नर हवे तसे साफ केले जात नाहीत. अनेकदा ते काळे झालेले असतात किंवा त्याच्यामध्ये अन्नपदार्थ अडकलेले असतात. आजच्या लेखात आपण बर्नर साफ करण्याबाबत एक सोपी ट्रीक (Kitchen Hacks) जाणून घेऊया.

बर्नर साफ करण्याचा हा घरगुती उपाय अतिशय सोपा आहे. केवळ १ रुपयाच्या शाम्पूच्या पुड़ीचा वापर करून हे बर्नर साफ करू शकता. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय (Kitchen Hacks) आहे तरी काय ?

साहित्य

मीठ, शाम्पू ,लिंबाचा रस आणि कोमट पाणी हे सर्व साहित्य आपल्याला बर्नर (Kitchen Hacks) स्वच्छ करण्यासाठी लागणार आहे.

कृती (Kitchen Hacks)

सर्वप्रथम बर्नर शेगडीवरून काढून एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर मीठ शिंपडा. त्यानंतर त्यावर एक रुपयाचा शाम्पू, अर्धा चमचा लिंबाचा रस घाला एका साध्या ब्रश ने हा बर्नर घासून काळपट डाग काढून घ्या. त्यानंतर सुईच्या मदतीने बर्नर मधले छिद्र स्वच्छ करा. छिद्र स्वच्छ केल्यानंतर एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या कोमट पाण्यात दोन मिनिटांसाठी बर्नर भिजत ठेवा. दोन मिनिटानंतर हाताने बर्नर स्वच्छ करा व हवे खाली वाळत ठेवा. बर्नर सुकल्यानंतर गॅस शेगडीवर ठेवा अशाप्रकारे बरोबर पाच मिनिटात चकाचक स्वच्छ (Kitchen Hacks) होईल.