Kitchen Tips : 2 मिनिटांत तेलकट काळा तवा करा चकचकीत; वापरा ‘ही’ ट्रिक 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वयंपाकघरात भांडी घासणे म्हणजे मोठे दिव्य आहे. भांडी घासणे हे त्रासदायक काम आहे. भांडी घासताना अनेकांना खूप त्रास होतो. परंतु भाडी घासताना एखादी युक्ती वा ट्रिक मिळाली तर हेच काम सोपे होते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक ट्रिक सांगणार आहोत. रोजच्या वापरातील तवा साफ करणं म्हणजे तर महाकठीण काम, कारण तव्याला तेल लागल्याने तो तेलकट होतो आणि त्याला घासायचा म्हंटल तर खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनेकजण वैतागतात. खराब झालेला अथवा काळा पडलेला तवा साफ करताना हाताची जळजळ होते. मात्र यावर आता आम्ही रामबाण उपाय सांगितला आहे.

काळपट पडलेला तवा साफ आणि चकचकीत करायचा असेल तर तुम्हाला अगोदर १ कप चहा तयार करावा लागेल. चहा पावडर हे असे साधन आहे की, त्याद्वारे तुम्ही तव्याची साफसफाई करू शकता. चहा आणि तवा यांचा सुतराम संबंध येत नाही, परंतु ही ट्रिक करताना तो येणार आहे आणि आपले काम लवकर होणार आहे. प्रत्येक घरात चहा तयार केला जातो. चहा तयार करताना जी चहा पावडर शिल्लक राहते, त्याचा वापर करून तुम्ही तवा पूर्णपणे साफ करू शकता. त्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे हे खाली पहा.

गर्म तवे पर चाय डालते ही कमाल हो गया ,बहुत जरूरी वीडियो है एक बार जरूर देखे | 2024 kitchen tips

कसा करावा तवा स्वच्छ करण्यासाठी चहा पावडरचा वापर?

तवा गॅसवर ठेवल्यानंतर गॅस पेटवा. तवा गरम होणार आहे. तवा गरम होताच उकळलेल्या चहाची पावडर तव्यावर टाकली पाहिजे. त्यावर थोडे मीठ टाकाले पाहिजे. आता घासणीने चहा पावडर आणि मीठ एकत्र करून तव्यावर पसरवले पाहिजे. एकतर तवा गरम केल्याने तव्याचा चिकटपणा निघून जाणार आहे घासणीने तवा घासला पाहिजे. थोडा धूर येण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करणे योग्य होईल. तवा गरम झाल्याने चहा पावडरमधील रस निघून जाईल. स्वच्छ पाण्याने तवा धुतला की तव्याचा तेलकटपणा आणि काळपटपणा व चिकटपणा निघून जाणार आहे. अशा प्रकारे साधीसोप्पी ट्रिक वापरून तवा स्वच्छ होणार आहे.  युट्यूबवर@AvikaRawatFoods या नावाने असलेल्या पेजवर तवा स्वच्छ करण्याची युक्ती म्हणजे ट्रिक कथन केली आहे. ही ट्रिक वापरून तुम्ही तवा साफ होतो की नाही याची खात्री करू शकता.