लॉकडाउन मध्ये आई वडिलांना भेटण्यासाठी त्याने पालथे घातले 5 देश; सायकलवरून केला 2000 कि.मी. चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची महामारी आणि संचारबंदीच्या काळात घरी परतणाऱ्या अनेक कथा इतिहासात नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये आता युनान मधून स्कॉटलंडला शिक्षणासाठी गेलेल्या क्लेन पापादिमित्रियो या विद्यार्थ्यांचाही समावेश झाला आहे. त्याचे कारणही असेच आहे. आईवडिलांची खूप आठवण आली म्हणून त्याने सायकल घेतली आणि २००० किलोमीटरचा प्रवास केला. पापादिमित्रियो याने स्कॉटलंड मधून यूनानला पोहोचण्यासाठी  ४८ दिवस सायकल चालविली. तो घरी पोहोचल्यावर सारे कुटुंबीय एकमेकांना मिठी मारून बराच वेळ रडत होते. स्कॉटलंड मधील एबरडीन विद्यापीठात क्लेन इंजिनिअरिंग शिकतो आहे. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक शाखेत तो शिक्षण घेतो आहे. संचारबंदीमुळे स्कॉटलंड मधील शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आपण घरी परत जावे असे त्याला वाटले. Kleon Papadimitriou

 सायकल घेऊन बाहेर पडल्यावर मात्र आपल्या निर्णयावर त्याला पश्चाताप झाला. रात्री कुठे राहणार, काय खाणार, घरी कधी पोहोचणार असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले. या दरम्यान त्याला एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय भेटला ज्याने त्याला राहायची जागा सांगितली. तिथे पोहचून त्याने घरच्यांना कॉल करून मी घरी येत असल्याचे सांगितले. पहिल्या दिवशी सर्वात अधिक समस्यांमुळे रडू आले असल्याने क्लेनने सांगितले. चढती, खराब वातावरण या सर्वाना पहिल्या दिवशी सामोरे जावे लागल्याचे त्यांनी सांगितले. एका दिवशी सरासरी १२५ किमी अंतर त्याने पार केले. लीड्स मध्ये एका मित्राच्या घरी दोन दिवस राहिलो तिथेच खूप दिवसांनी अंघोळ केली असे तो म्हणाला.

इथून बाहेर पडल्यावर त्याचा दुसरा टप्पा ब्रिटन ते नेदरलँडपर्यंत होता. या प्रवासात त्याने काही भाग नावेत सायकल घेऊन केला. तो नंतर जर्मनीतील एका शिबिरात पोहोचला. इथे त्याच्या मित्राच्या मित्राने राहण्याची शिफारस केली. कोरोना विषाणूमुळे त्याला घरी राहण्यास सांगितले नाही. त्याने १५ मे ला एबरडीन सोडले होते. ४६ दिवसांच्या प्रवासानंतर तो ग्रीस मध्ये पोहोचला तिथे आईवडिलांना भेटून त्याची कोरोना चाचणी करण्यात आली जिचे अहवाल नकारात्मक आले. २७ जून ला तो अथेन्सला त्याच्या घरी पोहोचला.

हे पण वाचा –

अजबगजब ! सावत्र मुलापासून गेले दिवस, केले त्याच्याशीच लग्न

धक्कादायक ! रुग्णालयातील मोफत wifi वापरून रूग्णाने डाउनलोड केले तब्ब्ल 80 हजार अश्लील व्हिडीओ

हनिमूनसाठी जमवलेल्या पैशातून त्याने खरेदी केला गेमिंग पीसी 

मामा मुंबईहून लग्नाला आला आणि सगळं वऱ्हाड कोरोनाग्रस्त झाले 

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे