व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उधारीच्या पैशांवरुन चाकू हल्ला

औरंगाबाद – आमलेट ची उधारी कधी देणार या वादातून एकावर आमलेट गाडी चालकांनी चाकूने हल्ला केल्याची घटना सिडको बस स्थानकाजवळ घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, जीवन येडुबा भालेराव (35, रा. ब्रिजवाडी, चिकलठाणा) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचे सचिन संकपाळ व नितीन संकपाळ यांचा सिडको बस स्थानकाजवळ अंडा आमलेटचा हातगाडा आहे. नेहमीप्रमाणे भालेराव हे 9 फेब्रुवारीला आमलेट खाण्यासाठी संकपाळ बंधूंच्या हातगाड्यावर गेले.

त्यावेळी भालेराव यांना संकपाळ बंधूंनी मागील आमलेटच्या उधारी वरून शिवीगाळ व मारहाण केली. सचिन संकपाळ याने चाकूने मारून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सोनगिरे करीत आहेत.