आता मोबाइल नंबरशिवाय Aadhaar Card कसे डाउनलोड करावे हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजच्या काळात आधार हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे कार्ड झाले आहे, त्याच्याशिवाय आपण आपल्या घरातली तसेच सरकारी कामाचा विचारही करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपले आधार कार्ड कुठे हरवले तर एक मोठी समस्या निर्माण होते आणि विशेषत: आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आठवत नसेल तेव्हा. हे लक्षात घेता UIDAI ने ग्राहकांना आणखी एक विशेष सुविधा दिली आहे. आपल्या मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड डाउनलोड करणे आजकाल शक्य आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

UIDAI नुसार आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबर असणे बंधनकारक नाही. ज्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डाशी लिंक केलेला नाही ते UIDAI वेबसाईट – uidai.gov.in वर लॉग इन करून आपला युनिक 12 अंकी ओळख क्रमांक ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करा-

सर्वप्रथम UIDAI ची वेबसाईट uidai.gov.in वर लॉग इन करा

त्यानंतर “My Aadhaar” पर्याय निवडा

आता Order Aadhaar Reprint वर क्लिक करा

नंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी VID नंबर एंटर करा, त्यानंतर सिक्योरिटी कोड एंटर करा

यानंतर ‘My Mobile number is not registered’ पर्यायावर क्लिक करा.

आता आपण आपला मोबाइल नंबर एंटर करा जो आपल्या आधार क्रमांकासह रजिस्टर्ड नाही.

Send OTP वर क्लिक करा

अटी व शर्ती पर्याय पुढील बॉक्स समोर चेक-इन करा

आता Submit बटणावर क्लिक करा

ऑथेंटिकेशन नंतर, आपल्या कॉम्पुटर मॉनिटरवर ‘Preview Aadhaar Letter’ दिसेल

त्यानंतर ई-डाउनलोड साठी पेमेंट करा

आपल्या ई-आधारचे PDF डाउनलोड करा

PVC कार्ड दिले
UIDAI ने अलीकडेच कार्डची सुरक्षा लक्षात घेऊन आधार PVC कार्ड लाँच केले आहे. कोणताही आधार कार्ड धारक UIDAI वेबसाइटवरून नवीन पीव्हीसी कार्ड मागवू शकतो. UIDAI ने सांगितले आहे की,” नवीन पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) आधार कार्ड बाळगणे फार सोपे आहे. त्याचा आकार खूपच लहान आहे, आपण वॉलेट मध्ये आरामात ठेवू शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment