अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासूस परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. पावसामुळे रात्रीच्या वेळी किड्यांचा थवा येत असतो. हे किडे फक्त नदीच्या किनाऱ्यावर येत असतात यामुळे नदीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास (accident) सहन करावा लागतो. या किड्यांच्या त्रासाचा फटका काल 20 ते 25 वाहनधारकांना बसला आहे. यातील एका व्यक्तीची गाडी कारच्या समोर स्लिप झाल्याने (accident) चाकाखाली गेल्याने जवळपास 10 फूट फरफटत गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
कोल्हापूर आणि शिरोलीला जोडणारा एक पूल आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी रहदारी असते. या भागात गांधीनगर कापडाची मोठी बाजारपेठ असल्याने दिवाळीनिमीत्त मोठी गर्दी झाली होती. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसात काही किडे येत असतात हे किडे फक्त नदी किनाऱ्यावर असतात. त्यामुळे याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा (accident) लागतो.

दरम्यान वाहन धारकांना अचानक आलेल्या समस्येमुळे गोंधळून वाहने घसल्याने जवळपास 20 ते 25 वाहने एकमेकांना आदळ्याची घटना घडली होती. याचबरोबर एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच स्लिप झाल्याने (accident) तो चाकाखाली जवळपास 10 फुटांपर्यंत फरफटत गेला. या व्यक्तीचे नशीब चांगले म्हणून या व्यक्तीला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती