Sunday, April 2, 2023

कोल्हापूरात मुलांचे लैंगिक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोघांना अटक

- Advertisement -

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर
लहान मुलांचे लैंगिक छायाचित्रण असणारे व्हिडीओ आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या दोघांना कोल्हापूरच्या सायबर क्राईम विभागाची पोलिसांनी अटक केली. अमोल कुस्तास डिसोझा आणि विशाल दत्तात्रय अत्याळकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.

अश्लील पोर्नोग्राफी, चाईल्ड पोर्नोग्राफी असलेले व्हिडीओ तयार करून त्यांचे प्रसारण करण्याचे प्रमाण वाढल्याने गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस अ‍ॅप यांवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवण्यात येत आहे. असे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. सोशल मीडियाचा वापर करून अश्लील व्हिडीओज, चाईल्ड पोर्नोग्राफी असलेले व्हिडीओ अपलोड आणि डाऊनलोड करणारया वापरकर्त्यांची माहिती भारत सरकारच्या सूचनेनुसार फेसबुक च्या कॅलिफोर्निया कार्यालयाने उपलब्ध करून दिली होती. त्यांनी ही माहिती महाराष्ट्राच्या सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिली. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकरणांचा तपास कोल्हापूर सायबर पोलिसांकडे आला होता. कोल्हापुरातून स्त्री-पुरुष संबंधाचा एक अतिशय अश्लील व बीभत्स व्हिडीओ फेसबुक मेसेंजरद्वारे पाठविण्यात आल्याचे व तो अमोल डिसोझा याने अपलोड केल्याची माहिती स्पष्ट झाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक शोधून माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ व ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

त्यानंतर २९ एप्रिल २०१९ ला करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथून लहान बालकांशी अनैसर्गिक संभोगाचे चित्रीकरण असलेला व्हिडीओ विशू डॉट शेळके डॉट ९ या फेसबुक मेसेंजरवरून अपलोड झाल्याचे स्पष्ट झाले. तपासात हा मोबाईल विशाल अत्याळकर वापरत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.