घोरपडीच्या गुप्तांगासह सापडल्या धक्कादायक वस्तू; कोल्हापूर वनविभागाची कराड, सातारातील दोन दूकानांवर धाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा वन विभाग सातारा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काल वनविभागाने विजय बाबुराव धावडे&सन्स,कराड व प्रशांत जनरल&पूजा भांडार कराड या ठिकाणी धाडी घालून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये बाळगणे,विक्री करणे साठी प्रतिबंधित असलेल्या इंद्रजाल/काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष व इतर प्रतिबंधित वन्यप्राणी/वस्तू विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे. कराड शहरातील विजय बाबुराव धावडे&सन्स,कराड व प्रशांत जनरल&पूजा भांडार कराड येथील पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात धाडी टाकून सदरची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत विजय बाबुराव धावडे&सन्स,कराड या दुकानात ११ इंद्रजाल/काळे कोरल मिळून आले असून त्याबरोबर हत्ताजोडी ७ नाग व साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याचे कातड्यापासून बनविलेले ६ नग मिळून आले आहेत.सदरच्या वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९,३९,४३,४४,४८,४९,५१ अन्वये व जैव विविधता कायदा २००२ च्या कलम ७,२४,५८,६१ अन्वये प्रतिबंधित आहे. सदरचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यासाठी किमान ३ ते कमाल ७ वर्षापर्यंत शिक्षा आहे. दुकान चालक आरोपी विजय बाबुराव धावडे यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

त्यासोबतच प्रशांत जनरल&पूजा भांडार कराड या ठिकाणी टाकलेल्या धाडीत आरोपी प्रवीण प्रकाश देशमुख यास अटक केली असून इंद्रजाल/काळे कोरल ८ नग , हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले ११ नग, साळशिंग या कोल्हा सदृश्य प्राण्याचे कातड्यापासून बनविलेले १७ नग मिळून आले आहेत,त्यांचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरु आहे.

सदरची कारवाई श्री.महादेव मोहिते,उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री.महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा )सातारा,श्री.तुषार नवले ,वनक्षेत्रपाल (प्रा)कराड यांनी केली. या कारवाई मध्ये मानद वन्यजीव रक्षक श्री रोहन भाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तसेच वनविभागाने श्री.दत्त पूजा भांडार, सदाशिव पेठ सातारा आणि पंचमुखी पूजा साहित्य, सदाशिव पेठ सातारा व कोटेश्वर पूजा साहित्य, शाहू स्टेडीयम सातारा या ठिकाणी धाडी घालून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये बाळगणे,विक्री करणे साठी प्रतिबंधित असलेल्या इंद्रजाल/काळे कोरल नावाच्या समुद्री प्राण्याचे मृत अवशेष व इतर प्रतिबंधित वन्यप्राणी/वस्तू विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे. सातारा शहरातील श्री.दत्त पूजा भांडार,सदाशिव पेठ सातारा व कोटेश्वर पूजा साहित्य,शाहू स्टेडीयम सातारा येथील पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात धाडी टाकून सदरची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत श्री.दत्त पूजा भांडार या दुकानात ५९ इंद्रजाल/काळे कोरल मिळून आले असून त्याबरोबर चंदनाचे सुमारे ८० किलो तुकडे व सुमारे ६०० मोरपिसे मिळून आले आहेत.सदरच्या वस्तू वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९,३९,४३,४४,४८,४९,५१ अन्वये व जैव विविधता कायदा २००२ च्या कलम ७,२४,५८,६१ अन्वये प्रतिबंधित आहे.दुकान चालक श्री.संतोष लक्ष्मण घोणे यांना अटक केली सदरचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून त्यासाठी किमान ३ ते कमाल ७ वर्षापर्यंत शिक्षा आहे. दुकान चालक आरोपी श्री.संतोष लक्ष्मण घोणे यांना अटक केली असून मा.न्यायाधीश JMFC सातारा यांनी आरोपीस ०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

पंचमुखी पूजा साहित्य,सदाशिव पेठ सातारा या दुकानात आरोपी दत्तात्रय सदाशिव धुरपे,यांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून त्यांचेकडून ८.५ किलो वजनाचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.

आज कोटेश्वर पूजा साहित्य,शाहू स्टेडीयम या ठिकाणी आज सकाळी टाकलेल्या धाडीत आरोपी राहुल विजय निकम यास चौकशीकामी ताब्यात घेतले असून हत्ताजोडी या घोरपड या वन्य प्राण्याच्या शरीराचा भाग असलेले ९(नऊ ) अवशेष व मोरपिसे मिळून आले आहेत. त्यांचेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैव विविधता कायदा २००२ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरु आह.

सदरची कारवाई श्री.महादेव मोहिते,उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सुधीर सोनवले,सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण)सातारा,डॉ.निवृत्ती चव्हाण,वनक्षेत्रपाल (प्रा)सातारा,श्री.पावरा,वनपाल सातारा,श्री.प्रशांत पडवळ,वनरक्षक सुहास भोसले,साधना राठोड,राजू मोसलगी,अशोक मलप,सूर्याजी ठोंबरे,वाहनचालक सुरेश गभाले,संतोष दळवी यांनी केली.

Leave a Comment