लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी कोल्हापूर पोलिसांचा अनोखा सेल्फी पॉईंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाच्या संसर्गापासून जनतेला वाचवण्यासाठी सरकार, प्रशासन वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करत आहे. मात्र, तरीही काही बेजबाबदार महाभाग घराबाहेर हिंडताना दिसत आहे. अशांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी लाठी प्रसादाचे वाटपही करून पहिले पण काही जण सुधारतांना दिसत नाही आहेत. त्यावर आता कोल्हापूर पोलिसांनी एक जालीम उपाय शोधून काढला आहे.

तरुणांमध्ये सेल्फीच वेड हे काही लपून नाही. कोल्हापूर पोलिसांनी ही बाब लक्षात घेत बेजबाबदार नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट उभारला आहे. मी बेजबाबदार…मी सेल्फीश… बाहेर पडला त्याला कोरोना नडला अशा आशयाचे सेल्फी पॉईंट कळंबा परिसरात उभारण्यात आले आहे. पोस्टर बॅकग्राऊंड ला हार आणि मायताचे साहित्य ही ठेवण्यात आले आहे. जो कोण संचार बंदीचे उल्लंघन करील त्याला याठिकाणी गळ्यात हार घालून त्याचा फोटो काढण्यात येत आहे. त्यामुळं असा नामुष्कीचा सेल्फी काढण्याची वेळ तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर कोल्हापूरकरांनो घरात राहा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment