कोल्हापूरकरांवर पाणीपट्टी दरवाढीची टांगती तलवार; ३० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाने ३० टक्के पाणीपट्टी दरवाढीचा स्थायी समितीकडे सादर केलेला प्रस्ताव महासभेकडे मंजुरीसाठी शिफारस करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते. सभेत पूरबाधित घरफाळा व पाणीपट्टी माफ प्रस्तावावरुन प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

२०१३ पासून पाणीपट्टी दरात वाढ झालेली नाही. सरासरी दहा टक्के नैसर्गिक दरानुसार हा ६० टक्के दराचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून तयार करणे अपेक्षित होते. पण प्रतिवर्षी पाच टक्के दराने ३० टक्के दराचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. पण या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता महासभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. दरवाढीच्या प्रस्तावावर महासभेत चर्चा झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment