कोरेगाव राष्ट्रवादीची मागणी : DCC बॅंकेचे अध्यक्षपद नितिन पाटील यांना द्यावे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा बॅंकेत सहकार पॅनेलमधील बिनविरोध संचालक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितिन पाटील यांना अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेली आहे.

कराड येथे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेवून मागणी करण्यात आली. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारमंत्री पाटील विजयी झाल्याबद्दल कोरेगाव तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील व सहकाऱ्यांनी सत्कार केला.

सातारा जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी काॅंग्रेसह सत्ताधारी पॅनेलमधून भाजपचे तीनजण बिनविरोध झालेले आहेत. तर काॅंग्रेसचे दोनजण तर राष्ट्रवादी बंडखोर एकजण संचालकपदी निवडूण आलेले आहेत. जिल्हा बॅंकेत भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मतदार जास्त असून मागील पाच वर्षे अध्यक्षपदी तेच होते. आता वाई तालुक्यातील नितीन पाटील यांना अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.