Home Loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या किती आहे व्याजदर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोनाच्या काळामध्ये लोकांची पर्चेसिंग पॉवर खूपच कमी झाली होती. ति वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळे उपाय केले. रेपो रेटमध्ये होत असलेल्या कमी मुळे बँकेचे व्याजदर खूप कमी, म्हणजे 7 टक्क्यापेक्षा कमी होते. पण सध्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या स्पर्धेने बँकांनी व्याजदर खूप कमी केला आहे. व्याजदराने सद्ध्या नीचांक गाठला आहे. इतिहासात पहिल्यांदाच खाजगी बँकांचे व्याजदर सरकारी बँकांपेक्षा कमी आहे झाले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेने होम लोनसाठी व्याजदर सर्वात कमी ठेवला आहे. 6.75 टक्के व्याजदराने कोटक महिंद्रा बँक होम लोनचे वाटप करत आहे. त्यासोबतच युनियन बँक आणि एसबीआयचे व्याजदरही 6.80 इतके आहेत. या व्याज दराला अनबिलीवेबल होम लोन असे नाव दिले गेले आहे. कोविडच्या महामारीमुळे लोकांना मोठे आणि प्रशस्त घर घेणे गरजेचे आणि आवश्यक वाटू लागले आहे. सध्या घरून काम म्हणजेच, ‘वर्क फ्रॉम होम’ बहुतांशी कर्मचारी करत असल्यामुळे मोठ्या घराची आवश्यकता जाणवू लागले आहे. त्यामुळे जास्त लोक होम लोन घेतील, अशी बँकांना अपेक्षा आहे.

लोकांना मोठे, प्रशस्त आणि घरातही काम करता येऊ शकेल अशा घरांची आवश्यकता आणि गरज वाढली आहे. हे लक्षात घेऊन बँकांनी व्याजदरांमध्ये कपात करून कर्ज वाटपास सुरुवात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेचे सह अध्यक्षा एलिझाबेथ वेंकटरमण म्हणाल्या की, ‘बँकेच्या एवढ्या कमी व्याजदरामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशांमध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये होम लोनसाठी यावेळेला 6.75 ते 7.3 इतका कमी व्याजदर इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. यासोबतच गोदरेज हाउसिंग फायनान्सने सुद्धा 6.6 टक्के व्याजदराने घर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment