कृष्णा कारखाना निवडणूक : इंद्रजित मोहिते, जगदीश जगताप यांच्यासह आज 84 अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते आणि विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह 84 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आजवर 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर 56 अर्जाची विक्री झाली आहे.

आज शुक्रवारी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह सोनसळ येथील रघुनाथ कदम यांच्यासह 17 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रेठरे बुद्रूक – शेणोली गटातून माजी चेअरमन रयत पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते व आदित्य मोहिते, सोनसळ येथील रघुनाथ श्रीपती कदम, रेठरे खुर्द येथील बापूसोा पाटील, शेरे येथील अशोक रघुनाथ पाटील, अधिकराव निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

वडगाव हवेली – दुशेरे गटातून दुशेरेचे बाबुराव जाधव, आणे येथील श्रीरंग देसाई व आत्माराम देसाई, येरवळे येथील विलास पाटील, कोळे येथील राजेंद्र चव्हाण आणि विठ्ठल पाटील, येणके येथील जयवंत गरूड, वडगाव हवेली येथील सुधीर जगताप, सुहास जगताप, आनंदा जगताप, अशोक जगताप, अभिजीत जगताप, विजय जगताप, विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

काले – कार्वे गटातून आटके येथील सयाजीराव पाटील, प्रमोद धनराज पाटील, प्रकाश पाटील, अमित काळे, विजयसिंह पाटील, राजेश जाधव, बाळासोा पाटील, रमेश जाधव, पोपटराव जाधव, संजय जाधव, उदयसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर याच गटातून काले येथील अजित पाटील व चंद्रकांत पाटील, कार्वे येथील निवासराव पाटील व दिग्विजय थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सांगली जिल्ह्यातील नेर्ले – तांबवे गटातून बेलवडे बुद्रूक येथील जयवंत मोहिते, नेर्ले येथील विलासराव पाटील, सुभाष पाटील, मनोज पाटील व प्रशांत पाटील, कालवडे येथील मनोहर थोरात व भिकू थोरात, तांबवे येथील अशोक मोरे व विक्रमसिंह पाटील, रेठरे हरणाक्ष येथील महेश पवार, केदारनाथ शिंदे, विवेकानंद मोरे व सुभाष शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर याच गटातून बहे येथील हणमंत पाटील, लवाजीराव देशमुख, सयाजीराव पाटील यांनी तर बोरगाव येथील उदयसिंह शिंदे, जगन्नाथ पाटील व विलास शिंदे, कामेरी येथील अनिल पाटील व छाया पाटील, उरूण इस्लामपूर येथील शिवाजी पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र – वांगी गटातून येडेमच्छिंद्र येथील शिवाजी पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील, देवराष्ट्रे येथील बापूसोा मोरे, राजाराम महिंद, कुंडल येथील मुकूंद जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून टेंभू येथील अधिकराव भंडारे, गोळेश्वर येथील सहदेव झिमरे आणि कोडोली येथील धनाजी गोतपागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महिला राखीव गटातून बहे येथील जयश्री पाटील, सावित्री पाटील, सत्वशिला थोरात यांनी अर्ज दाखल केले आहेत. शेरेच्या उषा पाटील, व शुभांगी निकम, शिरटे येथील सुरेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती राखीव गटातून कामेरी येथील आनंदराव मलगुंडे व धोंडेवाडी दिलीप गलांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Leave a Comment