कॉमेडियन कुणाल कामराने राज ठाकरेंना ‘वडापावची’ लाच देऊ केली; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा नेहमीच आपल्या विनोदी उचपात्यांमुळं नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर कुणाल आपल्या शेरेबाजीतून तर कधी मिम्सच्या माध्यमातून अनेकांशी पंगा घेत असतो. याचबरोबर आपल्या ‘ Shut Up Ya Kunal’ या युट्यूबवरील टॉक शोमध्ये तो पाहुण्यांना बोलावून त्याची नेहमीच टांग खेचण्याचा प्रयन्त करताना दिसतो तर पाहुणेही त्याच्या शो दरम्यान एन्जॉय करताना दिसतात. कुणालच्या या शोमध्ये राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. मात्र, महाराष्ट्रातील एका नेत्याला आपल्या शो मध्ये आणण्यासाठी कुणालला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत.

कुणालने राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर हातात वडापाव घेऊन फोटो काढत त्यासोबत राज ठाकरेंसाठी लिहिलेलं एक खास विनंतीवजा पत्र स्वतः कुणाल कामराने ट्विट केलं आहे. त्या पत्रात, “मी तुमच्याबाबत केलेल्या अभ्यासामध्ये तुम्हाला किर्ती कॉलेजचा वडापाव खूप आवडतो असं कळलं, त्यामुळे तुम्हाला लाच म्हणून तोच वडापाव आणला आहे. किमान आता तरी तुम्ही माझ्या Shut Up Ya Kunal या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ द्यावी” अशी विनंती कुणालने राज यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणालच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment