Ladki Bahin Yojana : मोठी बातमी!! ‘या’ लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार

Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्या महिला इनकम टॅक्स भरत आहेत त्यांची नावे आता समोर येणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) महिलांच्या आयकरबाबत माहिती राज्य सरकारला देण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने 6 केंद्र सरकारकडे ही मागणी केली होती, अखेर या मागणीस मंजुरी मिळाल्यानंतर कोणकोणत्या महिला एकीकडे आयकर भरतात आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात याचा भांडाफोड होणार आहे.

महिला व बालविकास विभागाने 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे. कर भरणाऱ्या महिलांची ओळख पटवली जाईल. महिलांच्या पात्रतेचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यानंतर राज्य सरकार लवकरच एक परिपत्रक जारी करू शकते. आणि योजनेतून वगळलेल्या महिलांची माहिती देऊ शकते. यापूर्वीच्या तपासणीत 2 लाख अर्जांपैकी 2289 सरकारी कर्मचारी लाभार्थी आढळले होते, त्यांची नावं ताबडतोब हटवण्यात आली. तब्बल २२८२ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचं निदर्शनास आलं. Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेसाठी काय होत्या अटी ? Ladki Bahin Yojana

अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असल्यास अपात्र.
कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असल्यास अपात्र.
सरकारी कर्मचारी (आउटसोर्स, स्वयंसेवी किंवा कंत्राटी कर्मचारी वगळता) अपात्र.

दरम्यान, आत्तापर्यंत 2.30 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्याने अपात्र झाल्या आहेत. 1.10 लाख महिला वय 65 वर्षांहून अधिक असल्याने अपात्र झाल्यात, 1.60 लाख महिला त्यांच्या घरी चारचाकी वाहनं असल्यामुळे अपात्र झाल्या आहेत. 7.70 लाख महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्या असल्याचे निदर्शनास आलं तर 2,652 महिला – सरकारी सेवेत कार्यरत असल्याने त्यांच्यावरही सरकार कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.

योजना सुरूच राहणार- आदिती तटकरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरूच राहणार असल्याचा पुनर्रुचार आदिती तटकरे यांनी केला. .महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलं.