लेडी गोविंदा.! राजस्थानी बिंदणीचा छतावर नृत्याविष्कार; व्हिडीओ झाला वायरल

वायरल व्हिडिओ – आजकाल सोशल मीडियावर वायरल होणं फार सामान्य बाब झाली आहे. कुणी हे केलं म्हणून फेमस. तर कुणी ते केलं म्हणून. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. सध्या अनेको लोक सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. यात अनेक तरुण आणि तरुणींचा समावेश आहे. मात्र तरुणांच्या तुलनेत तरुणींचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणूनच सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ जो एका राजस्थानी महिलेचा आहे, त्यावर मोठ्या संख्येने लाईक आणि व्युज आहेत.

 

सध्या व्हायरल होत असलेली हि महिला राजस्थान राज्यातील आहे. तिचे इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने फॉलोवर्स आहेत. तिचे नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ वायरल होताना दिसतात. यावेळी तिचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तो एक डान्सिंग व्हिडीओ आहे. तसे ही महिला तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच डान्स करतानाचे व्हिडीओ अपलोड करत असते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती महिला अभिनेता गोविंदावर चित्रित झालेल्या ‘मखना’ गाण्याच्या संगीतावर थिरकतेय.

 

 

मुख्य म्हणजे ही महिला हुबेहुब गोविंदासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करते आहे. तसे पाहाल तर काही प्रमाणात ती यामध्ये यशस्वीसुद्धा झाली आहे. यामुळे लोक तिला अगदी लेडी गोविंदा सुद्धा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे महिलेचा हा व्हिडीओ अन्य व्हिडिओपेक्षा जास्त सोशल मीडियावर वायरल होतोय. ही महिला अतिशय बिनधास्त नाचत असल्यामुळे नेटकरी तिच्या डान्सचे दिवाने झाले आहेत आणि तिचे भरभरून कौतुक करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा @radioactiveblossom नावाच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तर मोठ्या संख्येने लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे कमेंट्स करत आहेत.

You might also like