Monday, February 6, 2023

मिरगावला भूस्खलनाचा फटका : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली जखमींची भेट

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामध्ये 12 लोक मातीच्या ढिगाऱ्यखाली गेले असून काहीजण जखमी झाले आहेत.  या जखमी झालेल्या पुरुष, महिला, युवक, युवती यांना हेळवाक येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  जखमी लोकांची दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जखमींना प्रशासनाच्यावतीने मदत करण्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कराड-पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना- कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये आज कोयना धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात शुक्रवारी भूस्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामध्ये 12 लोक मातीच्या ढिगाऱ्यखाली गेले असून काहीजण जखमी झाले आहेत.

या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस करीत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. दरम्यान, हुंबरळी येथे भूस्खलनमुळे जखमी झालेल्या युवकाला हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले असून हुंबरळी येथील घटनेत एका वृद्ध महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या नागरिकांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद खराडे, पाटण, हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर उपस्थित होते.