आठवणीतल्या रिमा लागू..; शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेतली होती अकाली एक्झिट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि अगदी रुपेरी पडदादेखील गाजवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांनी ४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. त्या गेल्या मात्र त्यांची आठवणी आजही तितक्याच जिवंत आणि निरंतर आहेत. त्यांच्या अश्या अकाली मृत्यूमुळे मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही चांगलाच धक्का बसला होता.

https://www.instagram.com/p/CAedr2kJu2U/?utm_source=ig_web_copy_link

त्या मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत शूट करत होत्या. संध्याकाळी घरी परतल्या आणि मध्यरात्री त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. यानंतर रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. रीमा लागू यांनी त्यांच्या कारकीर्दीत ९५ हून अधिक चित्रपटांत आणि बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये अव्वल भूमिका वाजविल्या होत्या. मात्र त्यांच्या तू तू मै मै आणि श्रीमती या मालिका सुपर डुपर हिट ठरल्या.

https://www.instagram.com/p/CBqwez3pfw6/?utm_source=ig_web_copy_link

१८ मे २०१७ साली बॉलिवूड सृष्टीने एक हरहुन्नरी नायिका कायमस्वरूपी गमावली. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्री म्हणून विविध भूमिका केल्या. पण त्यांना प्रेमळ आईच्या भूमिकेने एक अनोखी ओळख मिळवून दिली. मराठीच्या बरोबरीने हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भक्कम पाय रोऊन उभे राहणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रीमा लागू.

https://www.instagram.com/p/COuDJTOpaJu/?utm_source=ig_web_copy_link

त्यांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात देखील काम केले होते. त्यानंतर बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी दमदार पदार्पण केले. हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया आणि कल हो ना हो यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावले. या चित्रपटातील ती प्रेमळ आई आजही प्रेक्षकांच्या मनामनांत जिवंत आहे.

https://www.instagram.com/p/BUOFqg4gpgr/?utm_source=ig_web_copy_link

तसे चित्रपट वगळता रीमा लागू खऱ्या आयुष्यात मॉर्डन आई होत्या. चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत चालू असताना रिमा व त्यांच्या पतित मतभेद होऊन ते काही वर्षांनंतर विभक्त झाले. याना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव मृण्मयी लागू आहे. मृण्मयी नाटक व चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. यासोबत ती एक उत्तम थिएटर दिग्दर्शक आहे.

https://www.instagram.com/p/BxXcI7OJgrZ/?utm_source=ig_web_copy_link

नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर रिमा यांनी पुन्हा लग्न करण्याचा कधी विचारच केला नाही. उलट एक सिंगल आई होऊन त्यांनी आपल्या मुलीचे योग्यरित्या पालन पोषण केले. स्वतःला व त्यांच्या मुलीला यातून सावरण्यासाठी रिमा यांनी अतोनात मेहनत केली. त्यांनी मुलीला कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. एक सिंगल मदर असतानाही त्यांनी मुलीला स्वतःच्या पायावर उभे केले. अश्या पद्धतीने रीमा लागू रिअल लाईफमध्ये आपल्या मुलींसाठी एक उत्तम आई आणि बाबा सुद्धा झाल्या.

https://www.instagram.com/p/BxmO8cfpfAR/?utm_source=ig_web_copy_link

 

फक्त पडद्यावर नव्हे तर पडद्यामागचे आयुष्य देखील त्यांचे असे होते कि मनात दुःख असेल तरीही चेहरा नेहमी हसराच हवा. मात्र रीमा लागू यांच्या निधनाने केवळ मृण्मयीला आईच्या नसण्याची कमतरता जाणवली असे नाही तर बॉलिवूड जगतातील अनेक मुलं पोरकी झाली होती. सलमान खानसह तर रीमा लागूंनी अनेक चित्रपटांत त्याची आई म्हणून भूमिका निभावली होती.

https://www.instagram.com/p/CDgkbgDpJhc/?utm_source=ig_web_copy_link

यामुळे रीमा लागू यांचे जाणे सलमानला पचवणे अगदीच अशक्य झाले होते. त्याच्या शोक सभेला सलमान अगदी ढसाढसा रडला होता. रीमा लागू एक अश्या अभिनेत्री होत्या ज्यांनी साकारलेली पात्रे प्रेक्षक खऱ्या आयुष्यात जगात होते. त्यामुळे अश्या या प्रतिभावान कलावंतीणीच्या आठवणीने डोळ्याच्या कडा ओलावणे अगदीच साहजिक आहे ना..

Leave a Comment