स्व. प्रेमिलाकाकी व आनंदराव चव्हाण यांचा स्मृतिदिन कार्यक्रम यावर्षी रद्द

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे आई – वडील तसेच कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन दरवर्षी 8 जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्मृतिदिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

माजी केंद्रीय मंत्री स्व. आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांचा स्मृतिदिन 8 जुलै रोजी व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे दरवर्षी या कार्यक्रम घेतले जातात. त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा या उद्देशाने दरवर्षी राज्य व देशपातळीवरील व्याख्यात्यांचे व्याख्यान कराड येथे आयोजित केले जातात. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जातो.

यावर्षी सुद्धा अशाच स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रशासनाने लागू केलेल्या नियमांच्या अनुषंगाने सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.