मनसेने विचारपद्धती बदलल्यास भाजप मनसे युती शक्य; राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचे प्रथमच भाष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत विचार करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनसे भाजप युतीवर भाष्य केले.

मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने व्यापक विचार करतो. पण मनसेचे विचार वेगळे आहेत. मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु, पण सध्यातरी ही शक्यता वाटत नाही.”

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच दीड तास भेट झाली होती. या भेटीनंतर मनसे भाजप युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीमित्त २३ जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची पुढील दिशा मांडणार आहेत. त सेच मनसेच्या नवीन झेंड्याचे अनावरण देखील या महाधिवेशनात होणार आहे.

Leave a Comment