सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आता गतीमान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २७ सप्टे़बरला लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २१ आँक्टोबरला मतदान व २४ आँक्टोबरला मतमोजणी होईल. या निर्णयामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये गेल्या शनिवारी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नव्हता. यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक आयोगाने साताऱ्यातील निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment