अजित पवारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला – गिरिश बापट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . भाजपने सत्ता स्थापन केल्या नंतर पुण्यात खासदार गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भारावून जल्लोष साजरा केला .

गेले २८ दिवस शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या तसेच सरकार स्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक बैठका चालू असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर उभे केले होते पण विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश असूनही आमच्या मित्रपक्षाने जनादेश डावलून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी आमची ३० वर्षा ची मैत्री तोडून वेगळा संसार थाटण्याचा प्रयत्न केला पण आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर आणि भक्कम सरकार अस्तित्वत आले आहे. असे गिरीश बापट यांनी प्रतिपादन केले

या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्री कसबा गणपती मंदिरात आरती करून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. या वेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे ,प्रमोद कोंढरे ,नगरसेवक हेमंत रासने धीरज घाटे ,आरती कोंढरे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्ये ने उपस्थित होते

Leave a Comment