शरद पवारांना साक्ष देण्यासाठी बोलवा – वकिलांनी केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे. त्यांनी चौकशी आयोगाकडं तसा अर्ज केला आहे. यावर आयोग काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाचा आणि त्यात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं होतं.

या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठक घेतली होती. पण, त्यानंतर काही तासातच हे प्रकरण केंद्र सरकारनं ‘एनआयए’कडे सोपवलं. त्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यानंतरही याप्रकरणावर वारंवार भाष्य केलं आहे. दोन दिवसापूर्वीच पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर अ‍ॅड. प्रदीप गावडे त्यांची साक्ष घेण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment