किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना पत्र; करून दिली जुनी आठवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र| देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकास मंजुरी मिळाल्यानंतर ईशान्य भारत अद्यापही धुमसत आहे. अनेक नागरिक रस्त्यावर उतरून हे विधेयक मागे घेण्याची मागणी करत आहेत. तर याच विधेयकावरून आता महाराष्ट्रातही राजकीय वातावरण पेटण्यास सुरवात आहे. या विधेयकाची राज्यात अंबलबजावणी करू नये अशी भूमिका काँग्रेस ने घेतली आहे. तर माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून शिवसेनेच्या जुन्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडले तेंव्हा शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर राज्यसभेत त्याला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस ने या विधेयकाची महाराष्ट्रात अंबालवजावणी करू नये अशी मागणी केली आहे. तर शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांग्लादेशी घुसकोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांग्लादेशी नागरिकांनी घुसकोरी केली आहे. त्यामुळे या घुसकोरी बांग्लादेशींवर कारवाई करावी, अशी मागणी सोमैय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान ज्या राज्यात भाजप विरोधी सरकारे आहेत त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जाब, केरळ, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकार नेमकं काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment