‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी असेल ग्राह्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । येत्या सोमवारी २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास पुढील १० पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 10 पुरावे :-
1) आधारकार्ड,
2) पॅनकार्ड,
3) ड्रायव्हिंग लायसेन्स (वाहन चालक परवाना),
4) पासपोर्ट (पारपत्र),
5) राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र,
6) छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक,
7) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड,
8) मनरेगा जॉबकार्ड,
9) कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,
10) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ).

यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.


“तुम्ही सुजाण नागरिक आहातच, आता सुजाण मतदारही व्हा !
सोमवारी, २१ ऑक्टोबरला अवश्य मतदान करा आणि आपला मतदानाचा हक्क बजवा !”
आम्ही आमच्या सर्व वाचकांना व हितचिंतकांना लोकशाही प्रक्रिया बळकट व सुदृढ होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यास आवाहन करीत आहोत.



Leave a Comment