ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना ‘तन्वीर सन्मान’ पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी – मयुर डुमणे । नटसम्राट डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीरच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘तन्वीर सन्मान पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांना जाहीर झाला आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी 2004 साली स्थापन केलेल्या रुपवेध प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचं हे पंधरावं वर्ष आहे. भारतीय रंगभूमीच्या प्रवाहात अतिशय महत्वपूर्ण, भरीव कामगिरी केलेल्या रंगकर्मींना तन्वीर पुरस्काराने सन्मानित केलं जातं. पुरस्कार देण्या मागचा उद्देश आहे. या आधी भालचंद्र पेंढारकर, विजय तेंडुलकर, सत्यजित दुबे, गो.पू. देशपांडे, विजया मेहता अशा 13 रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 2019 सालचा तन्वीर सन्मान पुरस्कार नसिरुद्दीन शहा यांना दिला जाणार आहे.

Image result for tanvir puraskar

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या हस्ते शाह यांना तन्वीर सन्मान पुरस्कर दिला जाईल. या प्रसंगी नसिरुद्दीन शहा यांच्या पत्नी रत्ना पाठक नसिरुद्दीन यांच्याविषयी बोलतील. तन्वीर पुरस्कार बरोबरच 2019 चा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार महाराष्ट्र कल्चरल सेंटरला प्रदान करण्यात येईल.

हा कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात संध्या 6:30 वाजता होईल. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सभागृहात तीन दिवस आधी उपलब्ध असतील.

Leave a Comment