नौदलाची ताकद आणखी वाढणार; २०२० पर्यंत ३ युद्धनौका दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली प्रतिनिधी। देशाच्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यास नौदल कायमच सज्ज असते. या मध्येच आता येत्या काळामध्ये नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. ”२०२० पर्यंत नौदलाच्या ताफ्यामध्ये आणखी ३ स्वदेशी युद्धनौका दाखल होणार असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हि बाब महत्वपूर्ण ठरणार आहे.

नौदलाने दीर्घकालीन योजनेत तीन विमानवाहू युद्धनौका ताफ्यात सामील करण्याचे ठरवले असल्याचे, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी मंगळवारी सागितले. नौदलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पात नौदलासाठीच्या तरतुदीत केलेल्या कपातीवर चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान या उद्दिष्टामुळे देशाला पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका मिळणार आहे. तसेच २०२२ पर्यंत ती कार्यान्वित होणार असून त्यावर मिग २९-के विमाने तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे नौदलाच्या दृष्टीने हि मोठी गोष्ट असून, नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. तसेच नौदलासाठी वार्षिक अर्थसंकल्पातील तरतूद गेल्या पाच वर्षांत १८ टक्क्य़ांवरून १३ टक्के झाली आहे. नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तरतुदीतील ही कपात योग्य नाही नसून नौदलाकडून या बाबीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment