आता भाजपातून मेगा एग्जिट…?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO,महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभर सुरु असलेल्या सत्तानाट्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्णविराम मिळाला. महाविकासघडीच्या ठाकरे सरकारला सत्तेत येऊन एक आठवडा पूर्ण होत असताना आता भाजपात मोठा भुकंब होणार असल्याची शक्यता आवर्तविण्यात येत आहे. भाजपातील जेष्ठ नेतेमंडळींबरोबरच निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेले १२ आमदार भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले आहेत. परंतु आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या आमदारांच्या या  भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजपने केलेल्या मेगा भरती प्रमाणे आता मेगा एग्जिट होणार की काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान या आमदारांनी आपली तयारी दर्शविली असली तरी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर हे आमदार राजीनामा देत पक्षांतर करणार आहेत. या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment