नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?; नो व्हेईकल झोनवर कविता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र। सोलापूर जिल्ह्यात ‘नो व्हेईकल झोन’ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पोलिसांनी ही या भूमिकेवर चांगलेच लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी यावर कविता करणं सुरु केलं आहे. पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी…चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी…अशा एक ना अनेक कवितांच्या सोशल मिडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

                                                                                                                                                             जिल्ह्यात मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नवीपेठेत सोमवारपासून सोलापूर शहर पोलीसांनी ‘नो  व्हेईकल झोन’ ची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे़. नवीपेठ बाजारात जाणारे सर्वच मार्ग बॅरिगेटस लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीपेठेत एकही दुचाकी अथवा चारचाकी गाडी जात नाही़. या पोलीसांनी घेतलेल्या निर्णयाला व्यापारी, लोकप्रतिनिधी, स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे.

 सोशल मिडियावरही या नो व्हेईकल झोनच्या प्रश्नावर सोशल मिडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत़. एवढेच नव्हे तर या प्रश्नांवरून कविता, शेरो-शायरी करण्यात येत आहेत़. सतीश वैद्य या फेसबुक युजरने नवीपेठेत नेता येत नाही गाडी़ मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? अशी पोस्ट शेअर केली आहे़. या पोस्ट शेअरनंतर नेटिझन्सकडून विविध कमेंट देण्यात येत आहे.

Leave a Comment