शरद पवारांच्या संमतीशिवाय सरकार बनलं हे पवारांना सिद्ध करावं लागेल – आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अजित पवार यांनी आज भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

लोकांनी माझे एकले असते तर आजचा सुखद धक्का त्यांना बसला नसता असं म्हणत प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. तसेच शरद पवार हे खरोखर पुरोगामी आहेत काय हे आता त्यांना सिद्ध करावं लागेल. आज बनलेलं सरकार हे शरद पवारांच्या संमतीशिवाय बनले आहे हे शरद पवारांना सिद्ध करावं लागेल असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेचा पोपट होऊ शकतो असं मी म्हणालो होतो. आज उल्लू कोण कोण बनलं असं तुम्ही विचाराल तर काँग्रेस आणि शिवसेना हे उल्लू बनले आहेत असं आंबेडकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला नाही हे सिद्ध केलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment