‘मी स्वप्नात बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार’; राऊतांच्या दिलखुलास गप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यातील महिनाभर सुरु असलेले सत्ता नाट्य थांबले आणि अखेर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. या दरम्यान शिवसेनेच्या बाजूने महत्वाची भूमिका मंडळी ती म्हणजे खासदार संजय राऊत यांनी. त्यामुळे सर्वांकडूनच त्यांच्या भूमिकेचे कौतूक करण्यात आले. या सत्तानाट्या दरम्यान सुरु असलेल्या घडामोडीवर राऊत यांनी सोमवारी भाष्य केलं आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातील सगळे खासदार दिल्लीत असल्याने, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सत्तासंघर्ष थ्रीलर सिनेमा प्रमाणेच रोमांचक होता. आता काय होईल, दुपारी काय होईल, संध्याकाळी काय होईल हेच सुरु होतं. पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का? शेवटपर्यंत ही गोष्ट आपण सगळ्यांनी पुढे नेली. हा सिनेमा रोमांचक, भयपट म्हणा, थरारक असा होता असं त्यांनी सांगितले.

तसेच अजित पवारांनी शपथ घेतली, सकाळी सकाळी अंघोळ करुन बसलो तेवढ्यात एकाने सांगितले अजित पवारांनी शपथ घेतली, मी म्हटलं की, मागची क्लीप असेल, हा फाजिल आत्मविश्वास होता. शरद पवारांवर आमचा विश्वास होता. शरद पवारांनी मनात आणलं आपल्याला हे करायचं आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. पवारांचा शब्दा होता फडणवीसांना घरी बसवायचा, साताऱ्यात पावसातही कमिटमेंट केली होती अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांचे यावेळी कौतुक केले.

Leave a Comment