मला जाणता राजा म्हणा असे मी म्हणालो नाही; शरद पवारांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : मला जाणता राजा म्हणा असे मी कधी म्हणालो नाही, असे म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. साताऱ्या जिल्ह्यातील खटाव-माण अॅग्रो प्रायव्हेट लि. या साखर कारखान्याच्या दोन लाख एकावन्न हजार साखर पोत्याच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते. जाणता राजा हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. सो कोल्ड जाणत्या राजांना ही उपाधी कोणी दिली हे मला माहिती नाही, असे म्हणत उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता टीका केली होती. पवारांनी या टीकेला साताऱ्यातुनच प्रत्युत्तर दिले.

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते

“शिवाजी महाराजांची उपाधी ही छत्रपती हीच होती. जाणता राजा ही शिवाजी महाराजांची उपाधी नव्हती. जाणता राजा ही उपमा रामदास स्वामींनी जन्माला घातली आहे. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच. राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू होत्या, असे मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांच्या संसारातून शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व घडले असल्याचेही पवार म्हणाले.

Leave a Comment