काश्मिरमध्ये ‘एसएमएस’ सेवा पुन्हा सुरू;  इंटरनेट मात्र बंदच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधून ‘कलम ३७०’ काही महिन्यांपूर्वी हटवण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी तो निर्णय घेतला. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सुरक्षेचा कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी ‘एसएमएस’ सेवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

काश्मीर खोऱ्यातील सुमारे ४० लाख ग्राहकांपैकी अनेकांनी आणि विशेषत: व्यावसायिकांनी ‘एसएमएस’ सेवा सुरू करण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यानंतर आता ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या ग्राहक त्यांच्या मोबाइलवरून वैयक्तिक संदेश पाठवू शकणार नसून, केवळ कंपन्यांद्वारे पाठविल्या जाणाऱ्या ‘सर्व्हिस मेसेज’ची सेवा सुरू करण्यात आली आहे.

ग्राहकांना विविध सेवांचा लाभ पुन्हा घेता यावा आणि व्यावसायिकांना बँकांच्या संपर्कात राहणे सोपे व्हावे यासाठी ‘सर्व्हिस मेसेज’ सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, काश्मीरमधील २५ लाख प्रीपेड मोबाइल, इंटरनेट सेवा आणि ‘व्हॉट्सअॅप’सारख्या ‘अॅप’ची सेवादेखील अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व सुविधा लवकरात लवकर पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Comment