पानिपतची लढाई ही लपवण्याची नाही तर अभिमानाची गोष्ट – उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पानिपतची लढाई ही अपमानाची नाही तर अभिमानाची गोष्ट असल्याचं वक्तव्य आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केलं आहे. मराठ्यांचा पराभव ही लपवण्याची गोष्ट नसल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत. पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात मराठा शिलेदारांना उदयनराजे यांनी यानिमित्ताने अभिवादन केले आहे.

मराठ्यांच्या पराक्रमाचा शौर्यदिन म्हणून १४ जानेवारी साजरा करण्यात येतो. मागील महिन्यातच मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य करणारा पानिपत हा आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपट रिलीज झाला होता. दिल्लीचं तख्त वाचवण्यासाठी अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दालीशी मराठ्यांनी दिलेला लढा या चित्रपटातून दाखवण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजे सहसा आपल्या भूमिका सार्वजनिकरित्या कमी प्रमाणात मांडताना दिसले. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून ते समाजमाध्यमांवर सक्रिय झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे उदयनराजे काय बोलतात याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. यासोबतच संजय राऊत यांनीही उदयनराजेंना डिवचण्याचा प्रयत्न मागील आठवडाभरात दिसून आला. त्यावरही उदयनराजे काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Leave a Comment