धक्कादायक ! कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल, पुरलेला मृतदेह उकरून काढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये आता रुग्णालयाचा भोंगळ कारभारदेखील समोर आला आहे. लातूर येथील गांधी चौकातील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याची घटना समोर आली आहे. हि घटना एका नातेवाईकाच्या लक्षात आल्यानंतर चक्क एका रुग्णाचा अंत्यसंस्कारानंतर पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय आहे प्रकार
लातूर शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे यांचा कोरोनामुळे मृत्य झाला होता. याचदरम्यान रेणापूर तालुक्यातील आबासाहेब चव्हाण यांचादेखील मृत्यू झाला होता. रुग्णालयाने धोंडीराम तोंडारे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने जो मृतदेह दिला तो न तपासताच ते घेऊन गेले. त्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारसुद्धा केले. त्यानंतर आबासाहेब चव्हाण यांचे नातेवाईक जेव्हा रुग्णालयात आले तेव्हा त्यांना धोंडीराम तोंडारे यांचा मृतदेह देण्यात आला. त्यांनी जेव्हा मृतदेह तपासला तेव्हा तो मृतदेह आबासाहेब चव्हाण यांचा नसून धोंडीराम तोंडारे यांचा होता. तेव्हा नातेवाईकांनी ही बाब रुग्णालयाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा धोंडीराम तोंडारे आणि आबासाहेब चव्हाण यांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे रुग्णालयाच्या लक्षात आले.

यानंतर चव्हाण यांच्या नातेवाईकांनी तोंडारे कुटुंबीयांकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तोंडारे कुटुंबीयांनी आबासाहेब चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. यानंतर तोंडारे व चव्हाण कुटुंबीयांनी चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढला. त्यानंतर तो मृतदेह चव्हाण कुटुंबाकडे सोपवण्यात आला. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment