मराठवाड्यातील पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट ‘या’ ठिकाणी सुरू; आता पुणे-मुंबईला जाण्याची गरज नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सिग्मा हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यातील पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया युनिट सुरू झाले आहे. 26, 27 जून रोजी पहिली शस्त्रक्रिया होईल. या सुविधेमुळे रुग्णांना मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही. प्रोस्टेट, कर्करोग, किडनी, थायरॉईड, गर्भाशयाची पिशवी काढणे यासह अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीने अचूक करणे शक्‍य होणार आहे.

यामुळे रुग्णाला कमीत कमी त्रास होईल. त्यांचा हॉस्पिटलमधील मुक्कामही कमी होईल, असे सिग्माचे प्रमुख डॉ. उन्मेष टाकळकर यांनी बुधवारी(9 जून) सांगितले. पुण्यातील प्रख्यात कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. शैलेश पुणतांबेकर रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी सिग्माच्या चमूमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात पहिल्या शस्त्रक्रिया होतील.

रुग्णाच्या शरीरावर व्रण राहत नाहीत. जखम तुलनेने वेगात भरून येते. अशा शस्त्रक्रियांचा खर्च अधिक असला तरी त्याचा खूप मोठा भार रूग्णांवर पडू नये, असा आमचा प्रयत्न आहे. अचूक त्यामुळे वेदना कमी होती सिग्माचे सीईओ डॉ. अजय रोटे म्हणाले, रोबोटिक शस्त्रक्रियेत अचूकता येते. विशेषत: कर्करोगाच्या शस्त्रक्रिया छोट्याशा छिद्रातून शरीराच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचता येईल. यामुळे रुग्णांना वेदना कमी होतील. रक्त वाया जाण्याचे प्रमाणही घटेल मराठवाड्यातील शेकडो रुग्णांना आतापर्यंत रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुण्याला जावे लागत होते. आता ही सुविधा त्यांना औरंगाबादेतच मिळेल.

सात कोटी खर्च
डॉ.टाकळकर यांनीही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया चे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सांगितले की, सुमारे सात कोटी रुपये खर्चून या युनिटची उभारणी केली आहे. यात डॉक्टरांचे कमीत कमी गरज लागेल. मात्र डॉक्टरांच्या नियंत्रणातच रोबोट शस्त्रक्रिया करेल. थ्रीडी चष्म्यातून डॉक्टरांना रोबोटच्या कामावर नजर ठेवता येईल. शरीरातील ज्या भागावर रोबोट शस्त्रक्रिया करेल तो भाग डॉक्टरांना अधिक खोलवर पाहणे शक्य होणार आहे. त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका टळेल.

Leave a Comment