हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राजकारणात एन्ट्री मारली असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील.
सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे. गेल्या महिन्यातच सुरेखा पुणेकर यांनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. आता अखेर त्या राष्ट्रवादी काॅंग्रसेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाच्या बातमीनं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आता राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच 16 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुरेखा पुणेकर यांनी सकाळला दिली.