फलटणला जुगार अड्यावर LCB पोलिसाची कारवाई
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सांगवी (ता. फलटण) येथे कल्याण जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात साडेबाराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात बापूराव पांडुरंग वाघ (वय- 35 वर्ष रा. सांगवी ता फलटण) याच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 23 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती. फलटण तालुक्यात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार यु. सी. दबडे व पोलीस नाईक काशिद व पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे हे पेट्रोलिंग करत होते. फलटण – बारामती जाणारे रस्त्याकडेला दत्त मंदिर पाठीमागे सांगवी (ता. फलटण) येथे बापूराव पांडुरंग वाघ (वय- 35 वर्ष रा. सांगवी ता फलटण) हा स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता लोकांकडून पैसे स्वीकारून आकडा व स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार घेताना आढळून आला आहे.
पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात त्याच्याकडून 1 हजार 245 रुपये रोख रक्कमेचा मुद्देमाल व जुगार साहित्य मिळून आले असून याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.