वा रे महाविकास आघाडी सरकार तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल – देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ व मद्यावरून महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. “केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर हा दहा व पाच रुपयांनी कमी केला. त्यानंतर देशातील 27 राज्यांनी पेट्रेल, डिझेलवरचा कर कमी केला. यावेळी महाराष्ट्राने आयातीत विदेशी मद्यावरचा टॅक्स मात्र महाराष्ट्राने कमी केला. आता महाराष्ट्रात व रे वा महाविकास आघाडी सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल, हि म्हणायची वेळ आली असल्याची टीका फडणवीसांनी केली.

मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवशी चांगलाच गाजला. यावेळी पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या दराबाबत विरोधक व सत्ताधारी यांच्यात चरचा करण्यात आली. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर निधाना साधला.

विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

ते म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर हा दहा व पाच रुपयांनी कमी केला. त्यानंतर महाराष्ट्र वगळता देशातील इतर 27 राज्यांनी पेट्रेल, डिझेलवरचा कर कमी केला. मात्र, महाराष्ट्राने आम्च्याकडे पैसे नसल्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करू शकत नाही, असे सांगितले.

शक्ती कायद्यावर विधानसभेत चर्चा

वास्तविक पाहता राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. या सरकारची प्राथमिकता काय आहे हेच आम्हाला कळत नाही. या महाविकास आघाडी सरकारने पेट्रोलवरील कर कमी करण्या ऐवजी दारूवरील कर कमी केला. नागरिक त्रस्त झगाले आहेत. दंगली भडकत आहेत. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाले आहेत. मात्र, सरकारच्या वतीने याबाबत कोणत्याच प्रतिक्रिया दिल्या जात नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Leave a Comment