उसतोड करता सापडले बिबट्याचे बछडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे उसतोड सुरु असताना शेतात बिबट्याचे बछडे सापडले. उसतोड करताना बिबट्याचे बछडे सापडल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ग्रामीण भागात सध्या उसतोड सुरु आहे. धोंडेवाडी येथे उसतोड कामगार उसतोड करत असताना त्यांना शेतात बिबट्याचे दोन बछडे सापडले. त्यातील एक बछडे जिवंत होते तर एक मृत अवस्थेत होते. मृत बछड्याचे ग्रामस्थांनी शवविच्छेदन केले.

बिबट्याचे बछडे सापडताच गावकर्‍यांनी वनखात्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहीती दिली. वनखात्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment